फाल्गुन महिन्याच्या शेवटी शेवटी आणि चैत्र महिन्याच्या आरंभी वसंत ऋतुचे आगमन होत असते. वसंताचे स्वागत करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी या उत्सवाचे नियोजन केले आहे. वसंतऋतू हा शिशिरची पानझडी थांबवून वृक्षवेलींना नवजीवन देणारा आहे. वनराईला बहार देणारा आहे. आंब्याचा मोहर फुलावणारा आहे म्हणूनच आपल्या पूर्वजांना त्याचे आगमन आवडले असावे.
वसंत ऋतू आपल्याबरोबर प्रकृतीचा कण आणि कण बहरत असतो. मानवंच काय पण पशुपक्षीना सुद्धा आनंद होतो. माघ शुक्ल पंचमीला हा उत्सव वसंत वसंतपंचमी म्हणून साजरा करतात. पूर्वापार काळापासून कलेची देवता सरस्वतीचा जन्मदिवस मानतात. अनेक शिक्षक, कलावृंद या दिवशी सरस्वतीची पूजा करतात. कलाकारांसाठी ही वसंत पंचमी अतिशय महत्वाची आहे.
ज्याप्रमाणे सैनिक विजयादशमीला शस्त्राची, विद्वान लोक पुस्तक / ग्रंथाची पूजा व्यास/गुरु पौर्णिमेला करतात व व्यापारासाठी वाहिपूजन दिवाळीला महत्वाचे असते. त्याचप्रमाणे कलाकार, वादक, नाटककार, नृत्यकार व गायक यादिवशी आपल्या उपकारणांची पूजा करतात.
ऋतू म्हणजे फिरता काळ, समस्त सृष्टीला कळवणारा, तिला हसवणारा, रडवणारा, नाटवणारा तिला तापावणारा, कोळपवणारा, सुकवणारा नि शेवटी तृप्त तृप्त करणारा कालाचा अंश म्हणजे ऋतू. घरात जे जे नवीन येतं ते ते पहिल्यांदा देवघरातील देवापुढे ठेवून त्यांना हळद कुंकू लावायचे अशी आपली संस्कृती आहे. तसेच शेतातून पिकलेले धान्य घरात आणले तरी ते प्रथम देवापुढे ठेऊन हळदी कुंकू लावून नंतर वापरावे अशी आपली प्रथा आहे.
पूर्वी घरोघरी शेती होती. शेतात आलेले धान्य प्रथम देवाला अर्पण करण्याचा कुलाचार प्रत्येक घरात दिसून येतो. शेतातून नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या देवघरात देवाला अर्पण करून मग नवान्न उपयोगासाठी आणायचे अशी प्रथा आहे. हा दिवस म्हणजे वसंतपंचमी. घरातील अन्नधान्य पुरून उरावे, सुखसमृद्धी टिकावी हा त्यामागचा उद्देश.
या दिवशी कामदेव व त्याची पत्नी रती यांचीही पूजा करतात. आपले गृहस्थ जीवन सुखमय, आनंदी व्हावे या उद्देशाने हा उत्सव साजरा करतात. तसेच विद्येची देवता सरस्वती माता यांचेही पूजन करतात. मुलांच्या जिभेवर मधाने दर्भाच्या सहाय्याने ' ऐं ' शब्द काढून विद्येचा संस्कार केला जातो. खूप विद्या संपन्न करावी हा या पाठीमागचा हेतू होय.
वसंतोस्तव हळदीकुंकूवाच्या निमित्ताने साजरा करून पन्हे, उसाचा रस, कैरी डाळ, कलिंगड, खरबूजचा अल्पोहार आलेल्या सुवासिनींना देतात. यातही ऋतुचर्येनुसार आवश्यक फलाहार कोणता करावा हे सुचविण्याचा हेतू आहे.
0 टिप्पण्या
If you have any doubt, Let me know.