जन कल्याण योजना - ऑनलाइन फॉर्म भरण्याची पद्धत


आपण श्री जनकल्याण योजनेच महत्व तर समजून घेतलं आता जाणून घेऊया की या अभिनव आणि कल्याणकारी योजनेत किती सहजरीत्या आपण सहभागी होऊन पुण्याचे मानकरी होऊ शकतो.
सर्वात आधी आपणास https://dindoripranit.org/ या संकेत स्थळावर जाणे आहे. हिच आपल्या दिंडोरी  प्रणीत 
स्वामी सेवा मार्गाचे  अधिकृत संकेत स्थळ होय. आपण आधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी काही स्क्रीन शोट्स चा वापर करूया.

1) https://dindoripranit.org/ या संकेत स्थळाला भेट द्या. 


असा इंटरफेस आपल्या समोर येईल. हीच आपल्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची अधिकृत वेबसाइट म्हणजेच संकेत स्थळ होय. यात आपणास "जनकल्याण योजना " दिसेल त्या खालीच नोंदणी फॉर्म ची लिंक आहे, तेथे क्लिक करा. त्यानंतर फॉर्म सुरू होईल.   


  2) फॉर्म भरून पूर्ण करा.  

नोंदणी फॉर्म म्हणजेच "Registration Form" वर क्लिक केल्यावर असा फॉर्म उघडेल. यात आपण आपले नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा. जेणेकरून त्यावर पुढील संपर्क योग्य  होईल. त्यानंतर आपण दरमहा दान करण्यास इछुक एवढी रक्कम सिलेक्ट करावी. दिलेल्या पर्यायांपैकी अधिक रक्कम आपणास देणगी द्यावयाची असल्यास आपण चौथा पर्याय निवडून आपली रक्कम त्यात भरावी.






आपला जिल्हा व राज्य निवडावे त्यानंतर पेमेंट चा पर्याय निवडावा. क्रेडिट कार्ड नसेल तर  डेबिट कार्ड व नेट बँकिंग हा पर्याय निवडावा. 



 एवढा फॉर्म भरून पुन्हा एकदा सर्व गोष्टी पुन्हा तपासून घ्याव्यात. आणि सबमिट येथे क्लिक करावे. त्यानंतर आपल्या फॉर्मचा एक टप्पा पूर्ण होईल. आणि आपणास "जनकल्याण योजनेत सहभागा बद्दल धन्यवाद" अशा आशयाची स्क्रीन येईल. फॉर्म पूर्ण झाल्यावर आपण फॉर्म मध्ये भरलेल्या मोबाईल नंबरवर मेसेज  आणि ई मेल आयडी वर ई मेल येईल.




फॉर्म पूर्ण झाल्यावर आपण फॉर्म मध्ये भरलेल्या मोबाईल नंबरवर मेसेज  आणि ई मेल आयडी वर ई मेल येईल.
3) फॉर्म चा दुसरा टप्पा.  
यात मेसेज मध्ये आलेल्या लिंक वर जाऊन आपण फॉर्म चा दूसरा टप्पा पूर्ण करू शकता.




 ई मेल मध्येही आपणास "AUTHORIZE" या बटनवर क्लिक करून दूसरा टप्पा पूर्ण करता येतो.
वरील दोन्ही बाबतीत खालील प्रमाणे स्क्रीन ओपन होईल.  




यात आपण आपली बँक कोणती ते निवडावे. आणि आपला पर्याय निवडावा. आपला पर्याय निवडून नाव, बँकेचा IFSC कोड योग्य तो भरावा. यात आपली बँक समाविष्ट नसेल किंवा आपणास अडचण येत असेल तर आपण श्री गुरुपीठ येथे संपर्क साधावा अथवा या ब्लॉग च्या कमेंट मध्ये आम्हाला ही सांगू शकता. 

त्यानंतर आपणास खालील प्रमाणे NACH स्कीन येईल.. यात "PROCEED" बटनावर क्लिक करून आपण व्यवहार पूर्ण करावा.  




"Mandate Registration Complete" असा मेसेज आला म्हणजे समजावे की आपली श्री जन कल्याण योजनेची प्रक्रिया पूर्ण झाली. आता दरमहा आपल्या बँक खात्यातून एवढी रक्कम मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल ल जमा होईल. आपणास देणगी बँक खात्यातून डेबिट झाल्या वर मेसेज आणि खालील प्रमाणे ई मेल प्राप्त होईल.

.
श्री जनकल्याण योजनेचे महत्व व स्वरूप जाणून घेण्यासाठी आपण खालील लिंक चा वापर करू शकतात. 
श्री जन कल्याण योजना  - "रुपयाचे दान पुण्य महान" 

श्री जनकल्याण योजनेत ऑनलाइन नोंदणी कशी करावी याचा विडियो यूट्यूब वर उपलब्ध आहे. आपण या लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकतात  https://youtu.be/cp_LWgKLkcw

विविध आध्यात्मिक माहिती व स्वामी सेवा मार्गाच्या उपक्रमाबद्दल, विविध स्तोत्र, मंत्र व त्यांचे महत्त्व व विविध विषयावर माहिती साठी आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तुमचा मेल आयडी पोस्ट करा, ज्या योगे आपणापर्यंत माहिती पोहचवणे सोपे होईल. सेवा कार्याच्या अधिक माहिती साठी WWW.dindoripranit.org या संकेत स्थळा लाही भेट देऊ शकतात.

श्री स्वामी समर्थ 

लिंक्स -

श्री जनकल्याण योजना   माहिती 

श्री जनकल्याण योजना नोंदणी ऑनलाईन फॉर्म



टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

  1. OUT of India Devotee if wants to make one time payment under Jan Kalyan Yojana. How we can pay.

    उत्तर द्याहटवा
  2. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏माझी बँक फॉर्म मध्ये दाखवत नाही, बँक ऑफ इंडिया, वाशी, ब्रांच तर बँकेची निवड कशी करावी कृपया मार्गदर्शन करावे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. जर कोणाला फॉर्म भरण्यात समस्या येत असेल तर कृपया फोन नंबर किंवा मेल आयडी सारख्या आपल्या संपर्क माहितीचा उल्लेख करा जेणेकरुन आमची कार्यसंघ समस्येचे निराकरण करण्यासाठी आपल्याशी संपर्क साधेल. आपली संपर्क माहिती इतर वाचकांना दृश्यमान होणार नाही.

      हटवा
  3. जर कोणाला फॉर्म भरण्यात समस्या येत असेल तर कृपया फोन नंबर किंवा मेल आयडी सारख्या आपल्या संपर्क माहितीचा उल्लेख करा जेणेकरुन आमची कार्यसंघ समस्येचे निराकरण करण्यासाठी आपल्याशी संपर्क साधेल. आपली संपर्क माहिती इतर वाचकांना दृश्यमान होणार नाही.

    उत्तर द्याहटवा

If you have any doubt, Let me know.