विद्या प्रदाता - श्री विद्या सरस्वती पूजन संच भाग १

अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तेजोनिधी मोरेदादा तसेच आपल्याकडे  लक्ष आहे अश्या गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन  श्री स्वामी समर्थ
भाविकहो माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो मातीच्या गोळ्यासारखा असतो. जसे कुंभार त्या मातीच्या गोळ्याचे रूपांतर सुंदर पात्रात करतो; तसेच आई जीवनाची पहिली गुरु बनून बाळाला सुसंस्कृत करते. वय वर्षे ५ ते ७ पर्यंत बाळाला सुसंस्कृत करून विद्या प्राप्ति साठी विद्यालयात शिक्षकांकडे ती जबाबदारी  दिली जाते. कुठल्याही  समाजव्यवस्थेत
शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षणाने समाज प्रगती करतो. १८३४ साली ब्रिटिश गव्हर्नर जनरल ने ब्रिटिश संसदेत अभिभाषण  करताना सांगितले की, भारतात आदर्श समाजव्यवस्थेचा कणा त्यांची शिक्षण व्यवस्था आहे. शिक्षणाणेच त्यांच्यात जीवनमुल्ये अशी भिनवली जातात, कि ती लोक आपल्या कार्यात कुशल व उच्च जीवन मूल्य आपल्या जीवनात आचरतात हा झाला इतिहास. परंतु वर्तमान स्थिती भयावह आहे. covid -19 च्या  प्रसाराच्या भीतीने शाळा विद्यालय कधी सुरू होतील याबद्दल साशंकता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात ढकलले जात आहे.

     
खरं तर गेल्या काही वर्षापासून विद्यार्थी हे विद्यार्थी नव्हते परीक्षार्थी बनले होते.परीक्षा असेल तर च अभ्यास करणारे फक्त परीक्षार्थी. परंतु आताच्या  या काळात पालकांच्या जबाबदारीत भर पडते; ती म्हणजे आपल्या पाल्यास विद्या सक्त बनवण्याची.
        लॉकडाऊन च्या या काळात बरेच लोक व विद्यार्थी घरातच आहे: अशात त्यांच्यात आळस, नैराश्य याने सुरुवात होऊन अनेक मानसिक व शारीरिक आजारांनी  ग्रासण्याचीही संभावना आहे
        अशात परीक्षांसाठी केला जाणारा अभ्यास व पाठांतर नसल्याने त्यांच्या भविष्यात मोठी आव्हाने निर्माण होण्याची संभावना आहे. पदवी चे विद्यार्थी तर नोकरीबाबतही साशंकित आहेत. आयुष्यभरासाठी शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार हे वर्ष ठरू शकते.
        या व अशा विविध संकटातून तारण्यासाठी आपल्याला आठवते महाराजांचे अभिवाचन "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे". महाराजांच्या आशीर्वादा बरोबरच संकटांवर मात करण्यासाठी आपणास भक्तिमार्गात विविध सेवा करणे क्रमप्राप्त आहे. साधारण एक ते दीड दशकापासून माझ्या निरीक्षणात मला आढळून आले की, परमपूज्य गुरुमाऊली विविध संकटांची भाकीत आधी करतातच आणि त्यावरील उपाययोजना व तोडगे स्वरूप सेवा सेवेकरी व स्वामी भक्तां करवी करवून घेतात. त्यामुळे सर्वच स्वामीभक्त व सेवेकरी वर्गााचा येणाऱ्या संकटापासून बचाव होतो व तो सुखावतो. प्रत्येक मासिक सत्संग सभेत माऊली प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरूपात येणारे सहा महिन्यातील संभाव्य धोक्यांवरील सेवा व उपायोजना यांचेही आपल्या हितगुजात समावेश करतात. यात आर्थिक संकटात साठी घरच्या घरी श्रीयंत्र कुबेर यंत्र पूजन, आरोग्यासाठी च्या संकटावर घरच्या घरी सहज रुद्र यंत्र पूजन, रुद्र सेवा सुवर्णभस्म जल बनवून पिणे तसेच विविध प्रश्नांवर स्वामींची नित्य सेवा, गुरुचरित्र, नवनाथ व भागवत यांचे महत्त्व व सेवा मन:पूर्वक कशा कराव्यात हे समजावून सांगतात. यातून सामूहिक रीत्या कौटुंबिक प्रश्नांना वाट मिळते. covid-19 च्या आधीच श्रीयंत्र पूजन, रुद्र सेवा नवनाथ पारायण, अन्नपूर्णा पूजन, देवीपाठ, कुलदैवत, कुलदेवता मान सन्मान करून सेवेकऱ्यांना आशीर्वाद प्राप्त करून दिला. सर्वांना या महामारी सोबत निर्माण झालेल्या प्रश्न मालिकेतून बचावले. तथा बहुसंख्य सेवेकर्‍यांनी कोरोना योध्यांना, दुःखी, आर्त, पीडित व गरजू लोकांना मदत पोहोचवली. यातूनच माऊलींची दूरदृष्टी दिसून येते.यामुळेच प्रत्येक स्वामीभक्त सेवेकरी महाराज व माऊली याना एकच नाण्याच्या दोन बाजू का समजतात हे लक्षात येईल.
        
१८३५ च्या इंग्रजी शिक्षण पद्धतीने परीक्षार्थी घडवले परंतु आज कोरोनाशी मुकाबला करताना ही शिक्षणपद्धती ढासळते की काय? असे वाटते. शाळेत न जाता घरी कितपत अभ्यास होईल यावर ही शंका आहेत.अशात आपल्या प्रत्येकासाठी स्वामी महाराज व माता सरस्वती यांना शरण जाणे क्रमप्राप्त आहे.
        या संकटाला संधी बनवून आपण आपल्या पाल्यांना परीक्षार्थीं न बनवता विद्यार्थी घडवू शकतो. परम पुज्य गुरुमाऊलींनी माता शारदेचा आशीर्वाद मिळवून देण्यासाठी आपणास सरस्वती पूजनाचा मार्ग दाखविला आहे. यात सरस्वती संच घेऊन आपणास नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे.

   
   यात आदर्श दिनचर्या, विद्याभ्यासात रस निर्माण करणारी स्तोत्र, मंत्र यातील प्राप्ती झालेली ऊर्जा दीर्घकाळ  वलय स्वरूपात टिकवून धरणारी यंत्रे व तोडगे यांचा समावेश आहे.
        यातून आपण आपल्या पाल्यांची प्रज्ञाविवर्धन म्हणजे बुद्धी वाढवू शकतो. तसेच हे संच व स्तोत्र मंत्र सेवा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी अभ्यास करण्यासाठी बहूपयोगी आहे. तेव्हा आपण प्रत्येकाने नक्की या सहभागी व्हा अधिक माहितीसाठी आम्हाला  खाली कमेेंट करुन सांगा. आपल्या नजिकच्या स्वामी केंद्रात सरस्वती संच उपलब्ध. आपल्या प्राचीन शिक्षण पद्धतीतील एक तत्व जरी   आपण आपल्या पाल्यात या योगे रुजवू शकलो तरी परीक्षार्थी न होता तो विद्यार्थी घडेल.


          संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या