श्री जनकल्याण योजना - “रुपयाचे दान पुण्य महान”

अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रम्हीभूत परम पूज्य पिठले महाराज, तेजोनिधी सदगुरु परम पूज्य मोरेदादा व प्रातः स्मरणीय परम पूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन; आपणा सर्व वाचकांना सादर प्रणाम.

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आरोग्य संपदेकडे खुप दुर्लक्ष केल जात. अनेक शारीरिक व मानसिक व्याधी व दुख: याकडे लक्ष देऊन त्यांची मूळ कारणे शोधून शाश्वत इलाज करण्याचा वेळ कोणाजवळही नाहीये. जन्मापासून तर मृत्यू पर्यंतच्या प्रवासात विविध आजार व विकारांनी बहुसंख्य समाज ग्रासलेला आहे. राहणीमानातील बदल व घातक खाद्य संस्कृती मुळे विविध आजारांनी सर्वांच्याच घरात शिरकाव केला आहे. एखादया घरात कोणालाही मधुमेह, रक्तदाब व हृदय विकार व या संबंधित आजार नसतील तर आश्चर्यच !

अशात धन्याढ व गर्भ श्रीमंत समाजवर्ग आपली संपत्ती खर्च करून या व्याधींना सामोरा जातो. परंतु असंगठित क्षेत्रात काम करणारे उपेक्षित, गरीब व मध्यम वर्गीयांच्या पदरी मात्र वैद्यकीय सेवा घेतांना उदासिनता व कधी कधी कर्जबाजारीपणा ही येतो. काही उपचार पद्धती ह्या गरीब व मध्यम वर्गाला परवडणार्‍या नाहीत व त्यांच्या आयुष्यभराची कमाई त्यात त्यांना खर्ची घालून पण आजार पूर्ण बरा होईल याची शाश्वती नसते.   

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ७० वर्षापासून समाजातील सर्व प्रकारच्या प्रश्नांना सोडवून दीन हीन, दुखी कष्टी व प्रश्नांच्या वेढयात त्रस्त असलेल्या प्रत्येकाच्या गालावरील गेलेले हास्य पुन्हा फुलवण्याचे थोर कार्य करत आहे. यात श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर व श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र, दिंडोरी हे केंद्रस्थानी राहून विविध १८ विभागातून सामाजिक व आध्यात्मिक कार्य करत आहे. ८०% समाजकार्य व २०% आध्यात्म हा मंत्र घेऊन, असंख्य दुखितांना त्यांच्या प्रश्नांवर सेवा देऊन, त्यांना स्वतःच आपल्या जीवानात इच्छित बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य श्री स्वामी महाराज व परम पूज्य गुरुमाउली यांच्या आशिर्वादाने प्राप्त झाले आहे, हे शाश्वत सत्य आहे. करोडो सेवेकर्‍यांना स्वामी सेवा मार्गाची प्रचिती आली असून स्वामींच्या “हम गया नाही जिंदा है ” या वचनाचा अनुभव सुद्धा आला आहे.

वैद्यकिय सेवांमधील खर्च गरीब व मध्यमवर्गीयांना परवडणारा नसल्याचे लक्षात घेता; सेवा मार्गाच्या माध्यमातून एक आगळया वेगळ्या आध्यात्मिक आरोग्य केंद्राचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक गरजू रूग्णाला माफक दरात (देणगी स्वरुपात) पायापासून ते डोक्यापर्यंत प्रत्येक आजार व व्याधींवर “दवा व दुवा” या दुहेरी फायद्याने उपचार मिळावे ही यामागची संकल्पना होय. हे आरोग्य केंद्र म्हणजेच सदगुरू परम पूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल होय. आपल्या प्रत्येक मासिक मीटिंग मध्ये परम पूज्य गुरुमाउली “आरोग्यम धनसंपदा” या विषयी हितगुजातून निरामय आरोग्यासाठी आयुर्वेद व आपण विसरत असलेल्या आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपचार सांगत असतात. आरोग्य ही प्रथम प्राथमिकता असावी हीच या मागील संकल्पना असावी, या संकल्पनेचे मूर्तीमंत स्वरूप म्हणजे परम पूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल होय.

रुग्णसेवेची मुहुर्तमेढ सेवा मार्गाच्या १८ विभागांपैकी प्रमुख “आयुर्वेद व आरोग्य विभाग” या अंतर्गत परम पूज्य गुरुमाउली यांनी २०१४ सालीच रोवली असून गुरुकुल पीठात ५० बेडचे प्रशस्त रुग्णालय सुरू झाले आहे. दर महिन्याच्या मासिक सभेच्या वेळेस अनेक सेवाभावी तज्ञ डॉक्टर मोफत आरोग्य तपासणी ची सेवाही देतात. तसेच गुरुपीठाच्या आजूबाजूच्या विविध दुर्गम व दुरापास्त खेडोपाडी चार रुग्णसेविका अम्ब्युलंस व तज्ञ डॉक्टर घरपोच आरोग्य सेवा (तपासणी व औषधी) पुरवत आहेत. आरोग्यसेवेसाठी समर्पित रुग्णालयाची इमारत प्रस्तावित असून या सेवेत आपण सहभाग घेऊन पुण्य प्राप्त करण्याची संधी म्हणजेच “श्री जनकल्याण योजना”. विविध मोठ मोठ्या उद्योजकांनी सेवा भाव न ठेवता प्रसिद्धी च्या लोभा पोटी देऊ केलेल्या देणग्या गुरुमाउलींनी नाकारून आपणा सारख्या सर्व सामान्यांना ही संधी दिली आहे. आजच्या काळात एखादे धार्मिक विद्यापीठ भासणारे व आध्यात्म व समाजकार्यात अग्रेसर, समाजाला आपल्या १८ विभागांनी दिशा देणारे गुरुपीठ ही असेच प्रत्येक सेवेकर्‍याच्या घामाच्या रूपयातून उभे राहिले आहे, हे आपण विसरता कामा नये.


श्री जनकल्याण योजना- स्वरूप  (निरामय आरोग्याचा आशिर्वाद)

श्री जन कल्याण योजना ही प्रत्येक कुटुंब व कुटुंबातील प्रत्येकासाठी आहे. प्रत्येक व्यक्तीने यात रोज एक रुपया दान द्यावे म्हणजेच महिन्याचे 30 रुपये होय. असे एका कुटुंबात पाच जण असल्यास एकूण दीडशे रुपये होतात. या पद्धतीने दीडशे रुपये अथवा आपली इछित रक्कम रुग्णालयाच्या बँक खात्यात दान द्यावी. ज्यांना शक्य असेल ते यापेक्षाही अधिक देणगी देऊ शकतात. अशा प्रकारे लाखो करोडो स्वामी भक्त व सेवेकर्‍यांच्या रोजच्या एक रूपयाच्या दानातून सेवाभावनेने रुग्णसेवा शक्य होईल. यात रुग्ण व त्याच्या नातलगास चहा, नाश्ता व जेवणाचीही सोय उपलब्ध होणार असून त्यातून आपणा सर्वांना अन्नदानाचेही पुण्य प्राप्त होईल. तसेच जो व्यक्ती सदगुरु प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या कार्यात सहभागी असेल, त्याच्यावर कुठल्याही हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येणार नाही, हा आशीर्वाद प.पू. गुरुमाउलींनी दिला आहे.

सदगुरू प.पू. मोरेदादा हॉस्पिटलची वैशिष्टे म्हणजे हे रुग्णालय तब्बल २१ एकराच्या विस्तीर्ण परिसरात साकारले जाणार आहे. हे एक अद्ययावत सुविधा असलेले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असणार आहे. या ठिकाणी निसर्गोपचार पद्धतीने आरोग्य प्रदान करणार्‍या, अत्याधुनिक शैल्यचिकित्सा व पारंपरिक चिकित्सेचा अनोखा संगम असणार आहे. यात प्रस्तावित सुविधा

हृदयविकार (Cardiac Care)

नेत्रविकार (Ophthalmology)

किडनी विकार (Nephrology)

कॅन्सर चिकित्सा (Cancer Treatment)

मेंदू विकार (Brain tumour and Oncology)

बालरोग चिकित्सा (Pediatrics, neonetal, postnetal)

स्त्रीरोग चिकित्सा (Gynaecology)

अपघात विभाग (Trauma center)

वात व्याधी (orthopedic, Spondylosis)

मधुमेह (Diabetes)

रक्तदाब (Blood pressure)

या रुग्णालयाची क्षमता 1000 हूनही अधिक असून यात आध्यात्मिक वातावरणात “दवा और दुवा” या सेतूचा आरोग्यदायी मिलाप या ठिकाणी असणार आहे.

याशिवाय यात रुग्णासेवेबरोबरच परिपूर्ण नर्सिंग कॉलेज ची ही संकल्पना आहे.

रुग्णालयास लागणार्‍या डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी वर्ग यामुळे रोजगार निर्मितीही होईल. त्यामुळे जनकल्याण योजनेत सहभागी कुटुंब आपल्या रोजच्या एक रूपयाच्या दानातून रुग्णसेवा, अन्नदान सेवा व रोजगार निर्मिती या सर्वांच्या योगाने राष्ट्रसेवेच्या पुण्याचे भागीदार होणार आहे. हाच “रुपयाचे दान पुण्य महान” या वाक्याचा मातीतार्थ होय.

ज्याप्रमाणे भगवान श्री कृष्णाने गोवर्धन आपल्या करंगलीने उचलला व प्रत्येकाला त्यास आपापली काठी लावावयास संगितले, त्या प्रमाणेच ही एक संधी आपल्या कडे चालून आली आहे, सदगुरु प.पू. मोरेदादा हॉस्पिटल तर होईलच पण त्यात आपल्या सहभागाने आपण आपल्या कुटुंबासाठी पुण्याचे वाटेकरी होणार आहोत. अनेक सेवेकरी या सेवेचे  अनुभव रूपाने दाखले सांगतात व सांगतांना त्यांचा कंठ दाटून येतो. असे विलक्षण अनुभव स्वामी देतात. दानाचे महत्व सांगतांना एक सुभाषित आपणास सांगते की 

"हस्तस्य भूषणं दानं सत्यं कण्ठस्य भूषणम् ।

श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणैः किं प्रयोजनम् ॥

म्हणजेच हातचे आभूषण दान आहे, कंठाचे सत्य व कणांचे शस्त्रांचे श्रवण ही आभूषणे धारण केल्यावर इतर आभूषनांचे प्रयोजनच व्यर्थ आहे. त्यामुळे दानाचे महत्व लक्षात घेता प्रत्येकाला शक्य असेल तेवढे दान प्रत्येकाने केलेच पाहिजे. असंख्य माता भगिनी आज रुग्णालयाच्या खर्च टाळण्यासाठी आजारांकडे दुर्लक्ष करतात व त्यामुळे आजार बळावत जातात. ही परिस्थिति बदलावी व प्रत्येकास मोफत व माफक दरात आरोग्यसेवा प्राप्त व्हावी हाच शुद्ध हेतु या संकल्पनेचा असून त्यासाठी प्रत्येकाने श्री जनकल्याण योजनेत सहभावी व्हावे ही नम्र विनंती.

श्री जनकल्याण योजनेत ऑनलाइन नोंदणी कशी करावी याचा विडियो यूट्यूब वर उपलब्ध आहे. आपण या लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पाहू शकतात  https://youtu.be/cp_LWgKLkcw

विविध आध्यात्मिक माहिती व स्वामी सेवा मार्गाच्या उपक्रमाबद्दल, विविध स्तोत्र, मंत्र व त्यांचे महत्त्व व विविध विषयावर माहिती साठी आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तुमचा मेल आयडी पोस्ट करा, ज्या योगे आपणापर्यंत माहिती पोहचवणे सोपे होईल. सेवा कार्याच्या अधिक माहिती साठी WWW.dindoripranit.org या संकेत स्थळा लाही भेट देऊ शकतात.

श्री स्वामी समर्थ 

लिंक्स -

श्री जनकल्याण योजना   माहिती 

श्री जनकल्याण योजना नोंदणी ऑनलाईन फॉर्म



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

If you have any doubt, Let me know.