गणेश जयंती

श्री स्वामी समर्थ

वक्रतुंड महाकाय। सूर्यकोटि सम प्रभ।
निर्विघ्न कुरु मे देव। सर्व कार्येषु सर्वदा॥

वक्राकार सोंड असलेल्या, विशाल काया आणि सूर्या सारखी प्रभा असलेल्या | हे प्रभू माझी सर्व कार्यें नेहमी निर्विघ्न पणे पूर्ण होवोत (अशी कृपा करा ).

माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती येते यालाच शांती, स्कंद,तीलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी भगवान गणेशाचा जन्मदिवस साजरा करतात.
 गणेश जयंती व गणेश चतुर्थी यात फरक आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला टिळकांनी समाज एकत्र येऊन देशासाठी काहीतरी कार्य करावं म्हणून सुरु केलेला गणेशोत्सव  हा दहा दिवसांचा असतो तर कुठे 11 दिवस असतो. मुंबईमध्ये ज्याला जसा वेळ आहे त्याप्रमाणे कोणी दीड, दिवसाचा तर कोणी पाच, सात, दहा दिवस गणेश मूर्ती घरी बसवून गणेशाची उत्साहात नित्यसेवा करतात.
 माग महिन्यातील शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती साजरी करतात. या दिवशी श्री गणेश भगवान यांनी श्री क्षेत्र काशी येथे धोंडीराज या स्वरूपात अवतार घेतला होता. या महिन्यात सुद्धा बरेच लोक आपल्या घरात गणेशाची पार्थिव मूर्ती स्थापन करून उत्सव साजरा करतात.   भगवान गणेशला तिळाचे मोदक बनवून नैवेद्य दाखवतात म्हणूनच याला तिला कुंद चतुर्थी असेही म्हणतात.
 या दिवशी आपल्या केंद्रातील आपल्या केंद्रातील किंवा आपल्याकडे उपलब्ध असलेले उटणे घेऊन त्यात तीळ बारीक वाटून घ्यावी व त्याने  सचैल स्नान करावे. तसेच आपल्या केंद्रात या दिवशी होणाऱ्या गणेश यागात सहभागी व्हावे यामध्ये आपल्या मुलांना सुद्धा सहभागी करून घ्यावे, ज्यांच्या मुलांच्या मुलांच्या पत्रिकेतला बुध बिघडला असेल, ज्यांची मानसिकता/ मानसिक स्थिती बिघडली असेल त्यांनी या गणेश यागात नक्की   भाग घ्यावा. गणपती ही बुद्धीची देवता  आणि विघ्नहर्ता असल्याने या सेवेने ज्ञान, बुद्धी वर्धन होऊन संकट मुक्ती होते. वैयक्तिक खालील सेवा करावी. 
सेवा :- २१ वेळा अथर्वशीर्ष
          ११ माळा स्वामी जप 
           १ माळ गणेश गायत्री मंत्र 
असे म्हटले जाते की आसुरांचा वध करण्यासाठी बाप्पाने तीन वेगवेगळे अवतार घेतले आहेत. यातील तिसऱ्या अवतारा बद्दल स्कंद पुराणात असे सांगितले जाते की, नरान्तक राक्षसाला ठार मारले होते, त्यासाठी त्यांनी कश्यपाच्या पोटी विनायक अवतार घेतला. म्हणून हा दिवस माघ जयंती म्हणून साजरा केला जातो.
हे दिवस थंडीचे असतात आणि आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी तीळ सर्वोत्तम असते, तीळ हाडे सुद्धा मजबूत करते. या थंडीच्या काळात आपण तिळ, मोहरी अशा तेलाचा वापर आहारात करणे हितावह असते. अशी आयुर्वेदिक, ज्योतिषीय, वैज्ञानिक, शास्त्रीय /पौराणिक सांगड या सणांची आहे.


आमच्या नवनवीन विषयावरील माहिती व ब्लॉग साठी, विविध अपडेट्स साठी आमचे WhatsApp चॅनेल follow करा.

येथे क्लिक करून WhatsApp चॅनेल follow करा. 



श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पणमस्तु.... श्री स्वामी समर्थ. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या