आरोग्य दूत लेख - १

श्री स्वामी समर्थ

श्री गुरुपीठ त्रिंबकेश्वर येथे १६ फेब्रुवारी २०२४ च्या जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या पार्श्वभूमीवर दि. ४  आणि १० फेब्रुवारी रोजी सूर्यनमस्कार व योग शिबीर आयोजित करण्यात आले. तज्ञ मार्गदर्शकांनी याठिकाणी उपस्थित आरोग्य दूत प्रतिनिधिंना सूर्यनमस्कार व योग शिबीर कसे घ्यावे यावर प्रशिक्षित केले. त्यावर आरोग्य दूत संकल्पनेवर आधारित हा ब्लॉग -

आरोग्य दूत विभागांतर्गत स्वामी केंद्रात मुख्यत्वे -

वैयक्तिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, मनोस्वास्थ्य, मनोबल कसे वाढेल, घरगुती आयुर्वेद, आजीबाईचा बटवा, विविध आजारांबद्दल जागृती, निरामय आरोग्यासाठी दिनचर्या, ऋतुचर्या, सकस व पूरक आहार, आहारशास्त्र, योग प्राणायाम व व्यायाम या विषयावर मार्गदर्शन केले जाते.


प्रस्तावना:

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपण इतके व्यस्त झालो आहोत की स्वतच्या आरोग्याकडे बघण्याची उसंत सुद्धा आपणांस नाहीये. आपण रोज काय खात आहोत आणि ते आपल्या आरोग्यासाठी कितपत योग्य आहे ते सुद्धा आपण बघायला तयार नाही आहोत. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मात्र असं ठिकाण आहे जिथे आपल्याला आध्यात्माबरोबरच आरोग्याविषयक मार्गदर्शनही केलं जातं. आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहित असेल की श्री स्वामी समर्थ केंद्र हे आपल्या १८ विविध विभागांतर्गत २०% आध्यात्म आणि ८०% समाजकार्य या मंत्रानुसार कार्य करते. त्यातील एक विभाग म्हणजेच आरोग्य विभाग, खरं तर आरोग्यविषयक  कार्याची समाजाला खुप गरज आहे. आजकाल पैसे देऊनही योग्य मार्गदर्शन आरोग्याच्या क्षेत्रात दिसत नाही. ऑपरेशनच्या नावाखाली सर्रास शरीराचे अवयव बदलण्याच्या व्यवस्था आहे, पण खंत अशी आहे की ते रोखले कसे जाईल वा योग्य त्या वयात योग्य शारिरीक काळजी कशी घ्यायची आणि आपण आजारीच पडू नये, याबद्‌दल प्रबोधन करायला हवे, याची सोय कुठेही नाहीये. आजाराची चिकित्सा तर ठीक आहे, पण आजार होऊच नये यासाठी काय करावे याचे प्रबोधन आणि त्या अनुरूप समाज व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ केंद्रांमार्फत आरोग्य विभाग हेच कार्य हाती घेऊन विविध आजारांवरच्या चिकित्सा या बद्दल प्रबोधन आणि त्यासाठी खर्चिक उपाय टाळण्यासाठी, आपल्या आयुष्यात काय उपाय अथवा बदल करावे याबद्दल यातुन मार्गदर्शन केले जाते. कारण बरेच आजार हे दिनचर्या बिघडल्याने म्हणजे lifestyle मुळेच होतात. "आरोग्यम धनसंपदा " या उक्ती प्रमाणे आरोग्य हेच धन आणि खरी संपदा आहे. आरोग्य कसे जपावे यातील पहिला मुख्य मुद्दा आहे-मनाच्या आरोग्याचा.

आजकाल आपल्या भावना इतक्या ठीसुळ झाल्या आहेत की कोणत्याही कारणांवरुन लोक टोकाच पाऊल उचलतात. दुसऱ्यांच्या फोटोवर जास्त लाईक आलेत तर द्वेष करतात. मनोबल / आत्मबळ क्षीण झालेलं असल्याचे हे लक्षण.या जाळातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्यावर एकच उपाय स्वामींचा जप. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज जप केल्याने आपल्या मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात आणि मनोबल वाढते. सुरुवातीला आपण कमीत कमी ११ माळी जप करून सुरुवात करावी त्यानंतर स्वामींचे नाम आपल्या मनी धारण करावे. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आपणास सांगतो - स्वामी नामाचा जप करता | चारी पुरुषार्थ येती हाता |

विदयार्थी इच्छित मार्क्स पडले नाही तर आत्महत्येस प्रवृत्त होतात,  त्यात मग ते शालेय विद्यार्थी असो, वा सो पदवीच्या शिक्षण घेत असलेले किंवा MPSC/UPSC देणारे. शेतकरी सुद्धा उत्तम पीक आणि उत्तम उत्पन कसे घ्यावे, याचा विचार न करता आमहत्येस प्रवृत्त होता. यात महलाची  भूमिका आहे मतो बुहारी मनोबल नसेल तर घडधाकट दिसणारा मनुष्य देखील काहीच कार्य करू शकत नाही. नैराश्यात मनुष्य काय करतोय ते समजण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता गमावून बसतो. अनेक विचार मनात थैमान घालतात व जे नसेल त्याचीही कल्पना तो करून स्वतःच आरोग्य बिघडवून घेतो. यासाठी उत्तम संवारा बरोबरच स्वामी नामाचा मोठा आधार मिळू शकतो.

ज्यावेळी मंत्रांचा जप करतो, आपले मन एकाच ठिकाणी केंद्रित होते व मनोबल वाढण्यास मदत होतो. यात आपण ११ माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप, रामरक्षेचा ३४ वा श्लोक म्हणू शकतो. मंत्र जपाबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः रोज तीन अध्याय सारामृताच वाचन या आध्यात्मिक सेवा व योग प्राणायाम जमेल तस केल्यास मन शुद्ध होईल.


नकारात्मक विचार व प्रतिकूल परिस्थिती वर मात करण्याचे मनोबल आपणांस महामृत्युंजय मंत्राच्या अभिषेकाच्या तीर्थाने प्राप्त होते. आपण स्वतःच ही साधना घरीच सोप्या पद्धतीने करु शकतो.

उत्तम मन स्वास्थ्य ठेवण्यासाठी घरात सुसंवाद  असणे खुप गरजेचे आहे. आपल्या घरात प्रत्येकाच एक स्वतंत्र विश्व असे न राहता सर्व सामायिक असाव. परस्पर सहजीवनातले सोबती आपल्या कुटुंबाच्या व्यक्ती असल्यास मनुष्य कधी निराशच होणार नाही. यात सुसंवाद के महत्याची भुमिका बजावू शकतो. यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे असे आदर्श वातावरण, खूप कमी घरामध्ये आपल्याला दिसुन येईल. मग जिथे लोक निराशेच्या गर्तेत असतील, मनात सतत विचार येत असतील आणि मन स्वास्थ्य बिघडले असेल तर श्री स्वामी समर्थ मंत्र जप व नामजप करणे हे उत्तम औषध आहे.

जेव्हा एखादा मनुष्य डिप्रेशन मध्ये जातो, त्याची रात्रीची झोप कमी होते, सकाळी उठल्यावर मळमळ होत आहे असे वाटते, जेवण कमी होते, जेवण नकोसे वाटते व मनात खुप विचार येतात. या अवस्थेत जर आपण अहोरात्र स्वामी नामाचा जप केला तर मनोस्वास्थ्य वाढते. सततच्या स्वामीनामाच्या जपाने मनोबल वाढीस लागते, निर्भयता प्राप्त होते. रोज कमीत कमी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या ११ माळी जप व क्रमश: ३ अध्याय स्वामी चरित्र सारांमृत पोथीचे वाचन करावे. "अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता। पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची ।। असे वर्णन व स्वामी भक्तीचे महात्म्य आपणास स्वामी चरित्रात वाचायला मिळते.

आहार -

जैसे खावे अन्न तैसे उपजे मन या उक्ती प्रमाणे आपण जसे अन्न खातो तसेच आपण बनत असतो. प्रत्येक व्यक्ती सुखासाठी धडपड करत असतो पण सात्विक आहार माहित नसल्याने अनेक शारीरिक व मानसिक विकरांना बळी पडतो. शुद्ध व सकस शाकाहारी आहार हाच सर्वोत्तम आहार आहे. मांसाहार वर्ज्य करावा, पांढरे मीठ, साखर, साबुदाणा, मैदा व बेकरीचे पदार्थ यांचा त्याग करावा. या वस्तूंचा फार वाईट प्रभाव आपल्या शरीरावर होतो. सेंधव मीठ, खांडसरी साखर आणि उपवासा साठी राजगिरा, शिंगाडा इ. चा वापर करावा. पोळी ऐवजी भाकरीचा वापर आहारात करावा ज्याने फायबर आपल्या आहारात आल्याने पचन सुलभ होते. 

आपल्या आरोग्यामधे सिंहाचा वाटा आहे तो आपल्या आहाराचा. आपण नेहमी शुद्ध,सात्विक शाकाहारी भोजन करावे, हेच आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम आहे. आरोग्य जपण्यासाठी दीर्घ कालीन सेवन केल्याने आपल्या शरीरात आजार व दोष निर्माण करणारे पदार्थ जसे की सागरी पांढरे मीठ, साखर, साबुदाणा, मैदा व बेकरीचे पदार्थ आपण जाणीव पूर्वक टाळावेत. तसेच आहारात शुद्ध तेलाचा वापर करावा. यात आपण एक-एक पदार्थाचा विचार केल्यास सागरी पांढरे मीठ हे NACL मध्ये सोडियम क्लोराईड असते. बीपी कमी झाल्यास डॉक्टर हे देतात. परंतु यात सागरी प्रदुषणामध्ये काही प्रमाणात सुक्ष्म म्हणजेच, मायक्रो प्लास्टिक असते, ज्याने आपल्या शरीरास अपाय संभवतो. त्याच बरोबर रक्तदाबा संबंधित आजार या मीठाच्या दीर्घकालीन वापराने होण्याची शक्यता असते. साखरेने आपल्या शरीरात इन्सुलिन निर्मिती ला अडथळा येऊन मधुमेहा सारखे आजार होऊ शकतात.

दिनचर्या व ऋतू चर्या

आपली दिनचर्या ही सूर्योदयच्या आधी सुरु व्हावी. लवकर निजे लवकर उठे तयास ज्ञान आरोग्य संपदा लाभे या प्रमाणे सकाळी लवकर उठावे. सूर्य नमस्कार व योग हा आपल्या रोजच्या जीवनात असावा. आपण जर आपल्या गत काळातील संत ऋषी आणि राजे यांचे चरित्र पहिले तर ते सूर्य नमस्कार करत असत. सूर्य नमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम यासाठीच म्हटला जातो की त्यानंतर इतर कुठला व्यायाम करायची गरज नाही. आधुनिक जिम मध्ये व्यायाम करणारे कित्येक हृदय विकाराने गेले पण सूर्य नमस्कार हा मात्र शाश्वत आणि बहुपयोगी व्यायाम प्रकार आहे. सकाळी उगवणाऱ्या सूर्य प्रकाशात आपण सूर्य नमस्कार केल्याने ड जीवन सत्व आपल्याला मिळते. आपण कितीही जेवलो तरी या ड जीवन सत्व खेरीज calcium आपल्या शरीरात शोषले जात नाही म्हणून आरोग्यासाठी गरजेचे आहे.


आमच्या नवनवीन विषयावरील माहिती व ब्लॉग साठी, विविध अपडेट्स साठी आमचे WhatsApp चॅनेल follow करा.

WhatsApp चॅनेल


श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्पणमस्तु.... श्री स्वामी समर्थ 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या