कृषी विभाग - जागतिक कृषी महोत्सव निमित्त आढावा....


 दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हे कार्य प.पु. गुरुमाऊली २०% आध्यात्म आणि ८०% सामाजिक कार्य या संकल्पनेतुन मानव सर्वार्थाने सुखी कसा होईल यासाठी करत आहेत. मानव हा समाजशील असल्याने सामाजिक कार्य हेच दैवी कार्य मानून कार्याचे विविध अभियान हे विविध १८ विभागांतर्गत सुरु असतात. गुरुमाऊलीच्या असीम शक्तीतुन आणि प्रेरणेतुन या १८ पैकी प्रत्येक विभागात विपुल कार्य सुरु आहे. प्रश्नोत्तर विभागांतर्गत दुःखी मानव सुखी करण्याचे कार्य आहे. तर कृषी विभागातुन शेतकरी राजा सुखी करणे हा उद्‌देश आहे.

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. परंतु आताची सामाजिक परिस्थिती पाहता शेती व शेतकरी सुधारणे हीच मोठी राष्ट्र सेवा घडू शकते. प.पु. गुरुमाऊली सांगतात की आपल्या देशाला गतवैभव प्राप्त करायचे असेल तर आपण 'उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी' हे ब्रीद घरोघरी पोहचवावे लागणार आहे. शेतीतील विविध संधी व बाजारपेठ यांचा अभ्यासक होऊन शेतीचे औदयोगिकीकरण व्हावे, हाच भाव मनी ठेवून गुरू माऊली आणि आबासाहेब कृषी विभागातील घोडदौड करत आहेत आणि हीच खरी काळाची गरज आहे. शेतकरी आत्महत्या रोखल्या जाव्यात व सर्व शेतकरी सधन व्हावे यासाठी हे मार्गदर्शक अभियान आज समाजात खुप प्रेरक आणि महत्वाची भूमिका बजावत आहे. उत्कृष्ट शेती कशी करावी, योग्य नियोजन आणि व्यवस्थापन कसे असावे या विषयांवर खुप कमी मार्गदर्शक समाजाला लाभले आणि यातील समाजाची भूक ओळखून गुरुमाऊली व आबासाहेब मातेच्या भूमिकेने या विभागाचे कार्य करत आहेत. जसे एखादी आई आपल्या मुलाचे संगोपन करते तसेच शेतकऱ्यांसाठी शेतीपुरक "अथ ते इति " पर्यंत सर्व विषय कृषी विभागात हाताळले जातात. नोकरीला प्रधान्य न देता शेतीकडे आजचा तरुण वळला तर त्यातुन समाज पुरक व्यवस्था निर्माण व्हायला नक्कीच मदत होईल. परंतु अशी मानसिकता आजकाल दिसत नाही. कारण या विषयांवर शिक्षण, मार्गदर्शन व शेतीतुन उद्‌योजक कसे व्हावे, हे ज्ञान घरोघरी पोहचणे गरजेचे आहे, त्यातून लोकांचा शेतीकडे पाहण्याचा व शेतक-यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. प.पु. गुरुमाऊली नेहमी सांगतात की. "अन्न हेच पुर्णब्रम्ह ' आहे तर शेतकरी हाच खरा भगवंत आहे.

बदलत्या परिस्थितीत शेती करणे कठीण होत जात आहे. मानव जातीच्या भौतिक प्रगतीने अशी परिस्तिती आहे की निसर्ग चक्र कधी बिघडेल हे सांगणे कठीण. परंतु याही परिस्थितीत न डगमगता काळानुरूप शेती व्यवस्थापनाची कास आता आपण धरावी. कृषी महोत्सवात आ. आबासाहेब यांनी एक मुद्दा असा मांडला की, नैसर्गिक आपत्ती नंतरही पिकाचा वापर आपण करत करवून घेऊ शकतो, याचाही अभ्यास शेतकऱ्याने करायला हवा. तंत्रज्ञानाचा वापर करून आपत्तींना तोंड देतांना दुसरी योजना काय याचा विचार मनी ठेवणे गरजेचे आहे. समजा कांदा पिकावर अतीवर्षाव झाला व नुकसान झालेच तर अशा कांदा पिकाचे पुर्नजीवन प्रगत तंत्रज्ञान वापरून (डिहायड्रेटर) वापरुन आपण कसे करू याचा अभ्यासक शेवकऱ्याने व्हावे, तसेच संशोधकांची मदत घ्यावी. अशा कल्पक व सर्जनशील संकल्पना मनी ठेवून जर शेती केली गेली तर "शेती उत्तम" हे ब्रीद सार्थ ठरावता येईल. प्रत्येक पिकाचे व्यवस्थापन हे भविष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांच्या अनुरुप केले गेले, तर शेतकयांची आर्थिक स्थिती सुधारणास ती एक संधी ठरेल. शेतकरी विविध नैसर्गिक आव्हानांना न डगमगता तोंड तर देईलच. तयापि सर्वार्थाने शेतकरी कल्याण यातून होईल. 

आताच्या वेळेची शेतीतील शोकांतिका म्हणजे असे म्हटले जाते की मागच्या पिढीत जी लोक हुशार लोकं होती ती शहरात नोकरीसाठी निघून गेली व शेतीची जबाबदारी घरातील अभ्यासात गती नसलेल्या व आईवडिलांना ज्यांच्याबद्‌दल असे वाटले की ही मुलं जीवनात काही करू शकत नाहीत, त्यांच्यावरच शेतीची जबाबदारी आली. अशा लोकांनी परंपरागत जशी घरात शेती करण्यात येत होती तशीच पद्धत अवलंबली व त्यामुळेच होत्याच नव्हत झाल. खर तर जन्मतः सर्वांना सारखीच बुद्धी प्राप्त होत असते. जरी अभ्यासात गती नसेल, तरी कार्यक्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली अनेक व्यक्तीमत्व आपण समाजात बघतो. शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून, शेतकरी योग्य प्रशिक्षित झाला तर त्यांची परीस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. कुठलाही व्यक्ती कोणतेही काम वा नोकरीमध्ये सुरवातीचा काही काळ हा त्यात प्रशिक्षणार्थी असतो. या प्रशिक्षण काळात त्याचे प्रशिक्षण जेवढे उत्तम तेवढे त्या व्यक्तीचे भविष्यातील कार्य उज्वल होत असते. परंतु या बाबतीतही शेतीत नैराश्यच दिसून येते. नदी जे शेतकरी योग्य प्रशिक्षण, पिकाचा अभ्यास व व्यवस्थापन सखोल विचारांनी करतात, ते सधन तर आहेतच, त्यांचा सामाजिक दर्जा व दराराही आहे. कारण शेतकऱ्याला बळीराजा उगाचच म्हटले गेलेले नाहीये. का तर सामान्यांपासून ते बळीराजा होण्यापर्यतचा प्रवास हा फक्त शेतकऱ्याच्याच नशीबी आहे.

जशी जीवनात सुख दुःखांची चढउतार चालू असते, तशी शेती व्यवसायातही चढ - उतार , तेजी-मंदी सुरुच असते. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने सर्वार्थाने फक्त शेतीवरच अवलंबून न राहता विविध जोड- व्यवसाय व त्यातून उत्पन्नाची साधने यांचा अभ्यास करणे, तज्ञ व अनुभवी शेतकऱ्याकडून त्याचे तंत्र समजून घेणे गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ केंद्राच्या कृषी विभागातर्गत शेतीला पूरक असे ५५ लघु उद्योग व त्यांचे व्यवस्थापन यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते. जेणेकरून शेतीचे औद्योगिकीकरण कसे करता येईल याचा विचार करावा. शेतकऱ्याने प्रक्रिया उद्योगाचा सखोल अभ्यास करून आपल्याला पूरक व सोपा जाईल असा एक उद्योग निवडून त्यात कार्य करावे. प्रक्रिया उद्योगात खुप कार्य केले जाऊ शकते. केळी, टोमॅटो, बटाटा, लसूण, अद्रक व विविध तेलबिया यांचा वापर तर आपण रोज आपल्या आयुष्यात बघतो व त्यावर प्रक्रिया करून लाखो नाही तर कोट्यावधीची उलाढाल आज सुरु आहे. पण यात दोन गोष्टी आहेत - एकतर बाजारपेठ ओळखून उत्पन्न घेणे आणि दुसरी म्हणजे सरकारी व शासकीय योजना माहिती करून घेणे त्याचा उपयोग करून घेणे. केंद्र सरकारच्या विविध पशु संवर्धन संबंधित योजना आहेत त्या आपण समजून घेऊन तसेच श्री स्वामी समर्थ केंद्राचा कृषी विभाग यात शेतकऱ्यांना मोलाचे सहकार्य करत असतो.

म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे सामर्थ्य ओळखून व योग्य मार्गदर्शन घेऊन, आपले भूतकाळाचे अनुभव व भविष्यातील योजना तयार कराव्या व शेतीला परंपरागत पद्धतीने करता करता नवीन पद्धती तंत्रज्ञान, नवीन पिके, नवीन बाजारपेठ, पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि आपल्या शेतीला पुरेसा जोडव्यावसाय या सर्वातून आपली यशस्वी वाटचाल करावी. कधीही विसरू नका की सर्वाधिक रोजगार व उत्पन्न हे कृषी माध्यमातूनच शक्य आहे. अधिक माहिती साठी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कृषी विभाग यांना संपर्क करावा.


श्री स्वामी समर्थ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या