एकादशी - ७ जानेवारी २४. सफला एकादशी पर्वावर जाणून घ्या एकादशीचे महात्म्य

सफला एकादशी - मार्गशीर्ष कृष्ण ११

आपल्या पंचांगात ५ अंग समाविष्ट असतात ते म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. यापैकी प्रत्येक वर्षातील प्रत्येक महिन्यात ३० दिवसात एकादशी ही तिथी दोन वेळा येते. एकदा शुक्ल पक्षात आणि एकदा कृष्ण पक्षात. पंचांगबद्दल अधिक माहिती साठी आमचा पंचांग ब्लॉग वाचा.

अशा प्रकारे एका वर्षात एकादशी २४ वेळा येते व प्रत्येक एकादशीच विशिष्ट महत्व आहे. साधारणता महाराष्ट्रात आषाढी व कार्तिकी या दोन एकादशी विठ्ठल सेवेमुळे सर्वांना ज्ञात आहेत. प्रत्येक एकादशी ही पवित्र आणि भगवंताला कृष्ण म्हणा विठ्ठल म्हणा वा विष्णु यांचा आवडता दिवस असे म्हटले जाते. आपण म्हणू शकतो की भगवंताला एकादशी च प्रिय का आहे? तर त्याची अख्यायिका पुढील प्रमाणे:

एकदा युद्धा नंतर भगवान विष्णू योग निद्रेत लीन होते. त्यावेळी एक राक्षस येऊन भगवंतावर प्रहार करायला येतो. तेवढ्यात भगवंतांच्या आतुन एक शक्ती बाहेर येते आणि ती शक्ती त्या राक्षसाचा संहार करते. भगवंत ज्यावेळी योग निद्रेतुन उठतात तर ती समोर असते व भगवंत त्या शक्तीला इच्छित वर मागायला सांगतात. त्यावेळी ती शक्ती असा वर मागते की प्रति पक्षात म्हणजे १५ दिवसात एकदा अशी तिथी असावी की त्या तिथीला आपली सेवा, भक्ती केल्यास त्या जीवास पाप स्पर्श होणार नाही व त्या तिथीला एकादशी संबोधले जाईल. पण पाप प्रवृत्ती विष्णुन्ना विनंती करते की त्या दिवशी मी कुठे असेल व जगाचा समतोल ढासळेल. त्यावेळी भगवंत त्याला सांगतात की त्या दिवशी तू अन्नात वास कर. जो अन्न ग्रहण करेल त्याला पाप स्पर्श होईल. म्हणूनच बहुसंख्य भक्त एकादशीला उपवास करतात.

वारकरी संप्रदायात एकादशीला विशेष महत्व दिले जाते. बहुसंख्य वारकरी खालील प्रमाणे विठ्ठल चरणी सेवा रुजू करतात:
एकादशीला निराहार म्हणजे काहीच खात नाहीत.
रात्रभर हरिजागर, कथा, किर्तन, सत्संग करतात.
अनवाणी राहतात आणि काही लोकं मौन धरतात.
द्वादशीला एकभुक्त म्हणजे एकाच वेळेस जेवण करतात तेही सूर्योदयाच्या अगोदर.
यात सांगायला गर्व वाटतो की हे जे आपले पूर्वज कित्येक हजारो वर्षांपासून करत आहेत याला २०१८ साली विज्ञानाने ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या दुजोरा दिला आहे. James P. Allson आणि Tasuku Honjo या दोन संशोधकांनी हे शोधून काढलं की एकादशी ला जसा उपवास केला जातो तसा उपवास १५ दिवसातून एकदा केल्यास आपली आंतरिक बळ वाढून विविध आजारांवर मात करू शकतो. या दोन संशोधकांचे म्हणणे आहे की हे असे उपवास सर्वांनी करायला हवे.  For full Research click here.

तुकाराम महाराज आपल्या अभंगात सांगतात:

एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन । श्‍वानविष्ठेसमान । अधम जन ते एक ॥१॥.                                    ऎका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन । गाती ऎकती हरिकिर्तन । ते समान विष्णुसीं ॥२॥                                  शुद्ध विटाळशीचे खळ । विडा भक्षितां तांबुल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥३॥

सेज बाज विलास भोग । करिती कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥४॥

आपण नवजे हरिकीर्तना । आणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा तो महोमेरु ॥५॥
तया दंडी यमदुत । झालेस तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकाद्शी चुकलिया ॥६॥
पंधरा दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥
काय तुझा जीव जातो  एका दिसें । फ़राळाच्या मिसें धनी घेसी ॥२॥
स्वहित कारण मानवेल जन । हरिकथ पूजन वैष्णवांचे ॥३॥
थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥४॥
तुका म्हणे कां रे सकुमार झालासी । काय जाब देसी यमदुतां ॥५॥

अर्थ असा की :-
एकादशीला भोजन करणारे अधम आहेत; ते खात असलेले अन्न कुत्र्याच्या विष्टे प्रमाणे आहे . एकादशी व्रताचे महत्त्व असे आहे की जे कोणी हे व्रत करतील, हरिकीर्तन करतील ते विष्णुसमान आहेत .एकादशीला जो पाणाचा विडा खाईल त्याने विटाळशीचा स्त्राव खाल्ल्याप्रमाणे होईल.त्याला काळ खाऊन टाकिल .या व्रताच्या दिवशी जो पत्नीशी व अन्य स्त्रीशी संग करेल, विविध प्रकारचे भोग घेईल, त्याला क्षय-महारोगासारख्या व्याधी जडतील .या दिवशी जो हरिकीर्तन करत नाही व इतरांनाही करू देत नाही तो पर्वता एवढ्या पापाचा धनी होतो, त्याच्या पापापुढे मेरु पर्वतही लहान वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक एकादशी व्रत करत नाही ते शिक्षेस पात्र आहेत व त्यांना यमदूत शिक्षा देतो .
इतर अभंग :-
आम्हा व्रत एकादशी । देव केशव तीर्थ तुळशी ॥१॥
आणिक नेणें बा साधन । आमचा विषय हरिकीर्तन ॥2॥
संत संगती निरंतर । प्रेम धन हे भांडार ॥3॥
विनवी विष्णुदास नामा । आमुची ऐसी परंपरा ॥4॥



आपल्या दिंडोरी प्रणित स्वामी सेवा मार्गात - स्वामी समर्थ केंद्रात बहुसंख्य सेवेकरी एकादशी च्या दिवशी श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण करतात, भगवान कृष्णाची सेवा करतात. जेणेकरून आपल्या घरातील जे कोणी अतृप्त आत्मे असतील त्यांना तृप्ती मिळून सोप्या पद्धतीने पितृ दोषातून मुक्ती मिळू शकते.

श्री कृष्णर्पणामस्तु
श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु

लेखन सहाय्य-
सौ. रुपम सनी बुरा, भाग्यनगरम.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या