अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ, ब्रम्हीभूत प.पू. मोरेदादा, प.पू. गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. श्री स्वामी समर्थ
सज्जनहो, श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, प्रधान केंद्र श्रीक्षेत्र दिंडोरी व नजीकचे श्री स्वामी समर्थ केंद्र या वास्तू; फक्त वास्तू नाहीत तर स्वामी इच्छा, कृपा, आपल्या गुरुवर्य आचार्यांची खडतर साधना या मुख्य गोष्टींनी या वास्तूंचा पायाभरणा केलाय. पण जनतेसाठी आपल्या आयुष्याचा क्षणो न क्षण वेचलेल्या आपल्या आचार्यांबद्दल आपल्याला फारच थोडी माहिती आहे. ब्रम्हीभूत प.पू. मोरेदादा व गुरुमाऊलींनी जे अफाट कार्य व आदर्श निर्माण केला आहे तो स्वामी सेवेकरीच नव्हे, तर जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे.
आज स्वामी मार्गाच्या केंद्रस्थानी गुरुपीठ असून ८०% समाजकार्य व २०% च आध्यात्मिक कार्य या आपल्या अदभूत प्रणालीने प्रत्येक देवस्थान व आध्यात्मिक पीठांसाठी उदाहरण बनले आहे, गुरुपीठातर्फे २०१३ या दुष्काळ असो किंवा २०१९ पश्चिम महाराष्ट्रातील ओला दुष्काळ, आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना अन्नदान, आदिवासी ग्रामीण क्षेत्रात घरपोच वैदयकिय सेवा, संचारबंदी व आणीबाणी सदृश्य परिस्थितीत गोर गरीबांना अन्नदान, धान्यदान या व अशा अनेक उपक्रमात उल्लेखनीय कार्य केले गेले आहे. प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात न येता कामावर लक्ष केंद्रित ठेवण्याच्या बाण्यामुळे आध्यात्मिक व सामाजिक कार्याबरोबरच वैदयकिय संशोधन शेती संशोधन क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून अनेक पुरस्कार तर मिळवलेच परंतु लोकांचा दृष्टीकोन शेती व आयुर्वेदाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल्याच अमुलाग्र कार्य केल आहे.
या अनुभव सिद्ध कार्याचे संस्थापक ब्रम्हीभूत प.पू. मोरेदादा. स्वामीमार्गातून लहानांना बालसंस्कार, अभ्यास पुरक विविध स्तोत्र , मंत्र, सामाजिक बांधिलकी, विविध देव-देवता, काळाच्या ओघात मागे पडलेले वेदातील आध्यात्मिक ज्ञान व तत्वज्ञान विनामुल्य देऊन समृद्ध केल जात. साधे विवाह, विवाहातील अनावश्यक मानापमान, त्यातील फोलपणा, बिना हुंडा विवाह, सात्विकतेने पारिवारीक संबंध घट्ट करणे व आई. - वडिलांस देवता मानते या बाबीवर समाज प्रबोधन अविरत चालू आहे. ब्रम्हीभूत प.पू. मोरेदादा हेच या कार्यप्रणालीचे संशोधक.
त्रिकालज्ञानी ब्र. प.पू. मोरेदादांनी धार्मिक कार्यांचा अवडंबर संपवून बासनात अडकून पडलेल्या पोथ्या, विविध मंत्र ,स्तोत्र विनामुल्य जन जनात पोहचवले. आज सहज पाठ असलेला महामृत्यूंजय मंत्र असो की कालभैरवाष्टक, नित्यसेवा तर त्यांनी संशोधन करून सामान्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, स्वामीचरित्र, गुरुचरित्र, नवनाथ ग्रंथ साहित्य त्यांनी जनसामान्यांच्या बरोबरीने स्त्रियांसाठीही खुले करून दिले. आध्यात्मिक ज्ञानाच्या बरोबरीनेच समता, बंधुभाव, दुःखी व पिडीतांचे आर्तता समजुन घेणारे वात्सल्य यांमुळे मोरेदादा सामान्यांसाठी देवतुल्य झालेत परंतु दादांनी प्रत्येक कार्याला स्वामी चरणी अर्पण करत सर्वांना विनम्रभावे स्वामींचेच गुरुपद घेण्याची विनंती केली. शेकडो वर्ष खितपत पडलेले वेदांचे ज्ञान सहज सोप्या भाषेत जनसामान्यांना उपलब्ध करून दिले. आपल्या ज्ञान साधनेने सर्वोत्कर्षात्मक विपुल साहित्य निर्मिती केली. प्रसंगी तदाकथित धर्म मार्तडांचा विरोध पत्करून वा त्यांना त्यांच्याच भाषेत शास्त्रार्थ करून गप्प केले; व बहुजनांच्या हिताचे कार्य सुरु ठेवले. काही सांप्रदायिक लोक फक्त चर्चा करायला येत असत जणू स्वताचेच पर्वत तत्वच नाही अशांना मार्गदर्शन करून स्वामी शिकवले जाई.स्वामी म्हणजे "मी" पणाचा स्वाहाकार. एकदा जगन्नाथ पुरीचे शंकराचार्य दादांच्या भेटीला आले असता भारावून गेले.. सेवेक-यांना विनम्र भावे उद्गारले, दादा म्हणजे सूर्य व की चंद्र"
क्षण न क्षण जनकल्याणासाठी खर्च करावा हेच दादांचे ब्रीद होते "निश्चयाचे बळ तुका पणे तेची फळ" या उक्तीप्रमाणे हाती घेतलेले प्रत्येक कार्य ते सिद्ध करत दृढनिश्चय , शिक्त व वक्तशीरपणा हे त्यांचे गुण प्रत्येकाने आचरणात आणण्यासारखे आहेत. भारतीय अध्यात्मिक तत्वज्ञानाला दादांनी सांप्रदायिकतेच्या चाकोरीतून बाहेर काढले. दुःखी, पिडीतांना तत्वज्ञान सांगितले नाही तर सुखी व संकटमुक्त करून तत्वज्ञानाचे अनुभव मिळवून दिला.
इ.स. १९२२ चा २१ मे रोजी श्री खंडेराव आप्पाजी मोरे उर्फ मोरेदादा यांचा जन्मदिन, बालपणीपासून ते कुशाग्र बुद्धीचे व रामभक्त होते. त्यांना रामरक्षा, विष्णुसहस्त्रनाम, रामदास स्वामींचा दासबोध बालपणीच मुखोद्गत होता. बालपणापासूनच दादा वारकरी, नाथपंथी, महानुभाव, रामदासी व शाक्त यांच्या कार्याचा व गुणदोषांचा अभ्यास करत असत या नानाविध पंथातील जेष्ठ/श्रेष्ठ लोकांना दादांनी अनेकानेक प्रश्न विचारून निरुत्तर केले.
तरुण वयातील दादा अध्यात्मिक सेवेतच नाही तर काळ्या आईच्या सेवतही प्रविण होते जणू काही भगवंताच्या शेती कौशल्यातून प्राप्त केलेल असाव दीन-दुबळ्या ,भोळ्या, अडाणी ग्रामीण जनतेची अवस्था त्यांना बघवेनाशी होत असे. प्रत्येकाच्या अडी-अडचणीत मदतीला ते नेहमीच तयार असत. त्यांच्या मातोश्रींनी जणू जीजाबाईचा आदर्श ठेवून पुत्ररत्नाला बहुजनांच्या कल्याणासाठीच घडवले.
एकाच लेखात मोरे दादांचा संपूर्ण जीवनप्रवास मांडणे हे शिवधनुष्य सामान्य सेवेकऱ्याला पेलवणारे नाही आणि म्हणून हि लेख शृंखला आपण सुरु ठेवू.आपण आमच्या WhatsApp चॅनेल ला follow करावे आणि पुढील येणारे ब्लॉग वाचावे हि विनंती
0 टिप्पण्या
If you have any doubt, Let me know.