रामदास स्वामींचे शिवरायांबद्दल लिहलेलं पत्र


सन १६८१ डिसेंबर 

अखंड सावधान असावे । दुश्चित कदापि नसावे ।
तजविजा करीत बसावे । एकान्त स्थळी ॥ १ ॥

काही उग्रस्थिती सांडावी काही सौम्यता धरावी ।
चिंता लागावी परावी | अतर्यामी ॥ २ ॥

मागील अपराध क्षमावे । कारभारी हाती धरावे ।
सुखी करूनि सोडावे । कामाकडे ।। ३ ।।

पाटवणी तुन निघेना । तरी मग पाणी चालेना ।
वैसे सज्जनांच्या मना । कळले पाहिजे ॥ ४ ॥

जनांच्या प्रवाहो चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला ।
जन ठायी ठायी तुंबला । म्हणिजे लोटे ।। ५ ।।

श्रेष्ठी जे जे मेळविले । त्यासाठी भांडत बसले ।
मग जाणावे फावले । गलिमांसी ।। ६ ।

ऐसे सहसा करू नये । दोघे भांडता तिस-यासि जये ।
धीर धरून महत्कार्य समजून करावे ।। ७ ।

आधीच पाडला धास्ती म्हणजे कार्यभाग होय नास्ती ।
या कारणे समस्ती । युद्धि शोधावी ॥। ८ ।।

राजी राखता जग । मग कार्यभागचि लगबग |
ऐसे जाणोनिया सांग समाधान राखावे ॥ ९ ॥

सकळ लोक येक करावे मलीम निपटून काढावे ।
ऐसे करिता कीर्ति धावे दिगंतरी ॥ १०॥

आधी गाजवावे तडाके । मग भूमंडळ धाके।
ऐसे न होता धक्के | राज्यास होती ।। ११।।

समय प्रसंग वोळखावा । राग निपटून काढावा ।
आला तरी कळो नेदावा । जनांमध्ये ।। १२ ।।

राज्यामध्ये सकळ लोक सलगी देऊन करावे सेवक
लोकांचे मनामधे भाक । उपजोधि नये ॥ १३ ॥

बहुत लोक मेळवावे । येक विचारे भरावें ।
कहे करोनि धरावे। च्छावरी ।। १४ ।।

आहे तितुके जतन करावे । पुढे आणिक मेळवावे
महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे | १५ |

लोकी हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी ।
चढती वाढती पदवी पावाल येणे || १६ |

शिवरयास आठवावे । जीवित्व तृणवत मानावे ।
इहलोकी परलोकी राहावे कीर्ते रूपे ।। १७ ।।

शिवरायाचे आठवावे स्वरूप शिवरायाचा आठवावा साक्षेप ।
शिवरायाचा आठवावा प्रताप । भूमंडळी ।। १८ ।।

शिवरायाचे कैसे चालणे । शिवरायाचे कैसे बोलणे ।
शिवरायाची सलगी देणे कैसे असे ॥ १९ ॥

सकळ सुखांचा त्याग करुनि साधीजे तो योग ।
राज्यसाधनाची लगबग | ऐसी असे ॥ २० ॥

त्याहून करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ।
याउपरि आता विशेष काय लिहावे ।। २१ ।।

श्रीसमर्थ रामदास स्वामी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या