महाशिवरात्री


 माघ कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्रि असे म्हटले जाते. महिन्याला शिवरात्री असते पण सगळ्यात मोठी रात्र असते म्हणून तिला महाशिवरात्री असे म्हटले जाते. या दिवशी भगवान शिवांची सेवा केली जाते.
 ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते. च्या उत्तुंग शिखरावर विराजमान भगवान आपल्याला सांगतात की ध्येय प्राप्त करण्यासाठी निश्चित अशी  उंची गाठली पाहिजे. शिव म्हणजे कल्याण, करण्यासाठी मार्ग काटेरी अवघड वाट चालावी लागते. श्रेय, करताना अनेक डोंगर दर्या खाजगळे चढावे लागते. तरच आपले कल्याण होते. हे आपल्याला शिव उंच पर्वतावर बसल्यामुळे समजते. म्हणून आधी आपल्याला देव समजून घ्यायचे आहेत. जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टी पासून उंच गेल्याशिवाय चमक  प्राप्त होत नाही. तसेच भगवान शिवांवर 24 तास  अभिषेक म्हणजे कोणत्याही कामात सातत्य दर्शवितो. म्हणून सातत्य ठेवल्याशिवाय आपल्याला काही प्राप्त होत नाही हे झालं वैज्ञानिक कारण
 अध्यात्मिक कारण -  भगवान शिवाने विष प्राशन केल्यामुळे  त्यांचा कंठ निळा पडला. आणि त्यांना संपूर्ण शरीर वर दाह झाला. या कारणामुळे भगवान शिवांवर 24 तास पाण्याचा अभिषेक केला जातो.
 आपल्या घरात महादेवाची पिंड नाग,नंदी विरहित असावी. फोटो अथवा मूर्ती नसावी. नाग व नंदी भगवान शिवांचे शिष्य असून वाहन आहेत. मंदिरात गेल्यावर मी बघतो की नंदी मंदिरा बाहेर असतो आणि नाग हा नेहमी भगवान शिवांच्या गळ्यात असतो. नाग गळ्यात धारण करण्याचे कारण असं की नागांचे कोणत्याही प्रकारचे त्रास मनुष्यास होऊ नये यासाठी.
 भगवान शिवांचे मूर्ती अथवा फोटो का नसावे -
भगवान शिव रात्री 12 नंतर स्मशानातले भस्म लावून नृत्य करतात व त्यावेळेस त्यांचे उग्ररूप ते धारण करतात. आणि म्हणूनच त्यांना नटराज असे म्हटले जाते. पण हे उग्ररूप आपण संसारिक लोक सहन करू शकत नाही.
 म्हणजे शिव शक्ती एकत्र लिंग स्वरूपात विराजमान आहे. शिवाय शक्ती अपूर्ण आहे आणि शक्ती शिवाय शिव अपूर्ण आहे. मानवी संसार ही तसाच आहे.
 पती (शिव) पत्नी (शक्ती ) दोघेही अपूर्ण आहेत. उभे असल्याशिवाय घराला घरपण व संसार पूर्ण होत नाही. याचा प्रतीक म्हणून पृथ्वी शिव आणि शक्ती लिंग स्वरूपात पूजा केली जाते.
 पिंड घरात कशी असावी -
 घरात पिंड भरीव पितळेची नाग,नंदी विरहित असावी,असा प्रघात चालत आलेला आहे. काही लोकांचे मानणे आहे की चांदी व पारद या धातूंपासून बनलेली  ठेवू शकतो तसेच त्यावरील तीर्थ विद्यार्थ्यांच्या बुद्धीसाठी चांगले असते. परंतु चांदी व पारद परम असल्याने हातातून पिंड पडण्याची किंवा सटकण्याची भीती असते त्यातून पिंडभंग होण्याची शक्यता असते. त्याकरिता भरीव पितळेची पिंड देवघरात असावी, असे म्हटले जाते.

 भगवान शिव पिंडीवरील अभिषेकाचे फायदे -
काहींना आलेल्या अनुभवाप्रमाणे शिवपिंडीवरील अभिषेक केल्याने व त्या तीर्थाचे प्राशन केले असता घरातील 80% आजार व व्यसन दूर होतात.
 जसे जसे पिंडीवर अभिषेकाचे पाणी पडत जाते तसे तसे आपल्या मित्रांना सद्गती मिळत असते. कारण मनुष्य केल्यावर  आत्म्याच काय करावे हे काम भगवान शिवांकडे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या