अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, परमपूज्य पिठले महाराज, तेजोनिधी मोरेदादा व परमपूज्य गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन. सर्वांना श्री स्वामी समर्थ.
आज आपण सरस्वती संच या विषयावर माहिती घेऊया. या सरस्वती संचातील माहिती पत्रकात आपण 'सरस्वती संचाचे पूजन कसे करावे ' ही माहिती दिली आहे.संचातील आसनावर दिलेला फोटो ठेवून पूजन करावे. श्री सरस्वती पुस्तिकेत विद्यार्थ्यांसाठी स्तोत्र मंत्रांची रचना केली आहे. या पुस्तिकेतील वासर स्तोत्र वाचल्यामुळे मुलांची अभ्यासातील प्रगती वाढते. नंतर लाल कपड्यातील पांढरी गुंज, आपट्याची पाने ,दुर्वा , रुईची फुले आणि शमीची पाने दिलेली आहेत. हे शैक्षणिक तोडगे माऊलींनी आपल्याला दिलेले आहेत.
सरस्वती संचातील 'नवग्रह शांती कारक काल सर्प निवारण यंत्र' या यंत्रावर मध्यभागी स्वतःचे नाव टाकून त्यावर रोज नवग्रह स्तोत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून सेवा करावी. यशप्राप्तीसाठी व कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी हा पेन वापरल्यास ते काम नक्की पूर्ण होते. हा पेन आपल्यासाठी एक माऊलींचा आशीर्वादच आहे. दर शुद्ध पंचमीला संचातील दिलेल्या दर्भाच्या काडीने आपल्या मुलांच्या जिभेवर मधाने एइम शब्द लिहावा . संचातील लिहिलेल्या रुद्राक्ष बद्दल माहिती आपल्याला पोम्प्लेटवर दिलेली आहे. श्री यंत्र, विद्या प्रदाता यंत्र, सरस्वती यंत्र, संरक्षण यंत्र, अद्भुत आरोग्य यंत्र व स्वामींचा फोटो सुद्धा आहे.
0 टिप्पण्या
If you have any doubt, Let me know.